मोबाईलचे दुकान फोडून 5 लाख 9 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करत असताना हारुगेरी पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडले आणि त्यांच्याकडून दोन दिवसांत सर्व मोबाईल जप्त केले.
हारुगेरी येथील कॅनरा बँकेजवळ आनंद परशुराम तेली यांचे आनंद कम्युनिकेशन नावाचे मोबाईलचे दुकान आहे. 20 रोजी रात्री ते 21 रोजी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी मागील भिंत तोडून दुकानात घुसून बारा महागडे मोबाईल चोरून नेले. आनंद परशुराम तेली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास केला
अवघ्या दोन दिवसांत संशयितांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 5 लाख 9 हजार किमतीचे 12 मोबाईल व 20 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रुती, अपर पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी, उपअधीक्षक श्रीपाद घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरी विभागाचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी., उपनिरीक्षक गिरिमलप्पा उप्पार , मलप्पा पुजारी यांनी कारवाई केली. या कारवाईत पोलीस बी. एल. होसट्टी, रमेश मुंडिनमनी, ए. एस. शेंडगे, एच. आर. अँबी, जी. एन. कागवाड, प्रकाश खवटकोप यांनी सहभाग घेतला.
Recent Comments