ARREST

31 वर्षांपासून लपून बसलेला आरोपी संकेश्वर पोलिसांना सापडला.

Share

कोर्टात हजर न होता पोलिसांना तब्बल ३१ वर्षे गुंगारा देणारा आरोपी अशोक वसंत कुलकर्णी याला महाराष्ट्र राज्यातील सांगली शहरात अटक करण्यात आली आहे . संकेश्वरचे पोलिस निरीक्षक एस.एम.आवजी व त्यांच्या पथकाने त्याला शोधून काढून , त्याला कोर्टात हजर केले आहे.

चिक्कोडी तालुक्यातील करोशी येथील अशोक वसंत कुलकर्णी याच्यावर स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तो गेल्या 31 वर्षांपासून संकेश्वर न्यायालयात हजर न होता फरार होता, न्यायालयाच्या आदेशानुसार गोकाक डीवायएसपी डी.एच.मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली . संकेश्वरचे पोलीस निरीक्षक एस.एम.आवजी यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी के.बी.कंठी, एस.आर.बेविनकट्टी यांनी अथक परिश्रमाने आरोपीला सांगली शहरात पकडून संकेश्वर न्यायालयात हजर केले.

Tags: