Belagavi

सहकार क्षेत्रात आपल्या भागातील सहकार रत्नांची भूमिका मोठी आ . अभय पाटील

Share

सहकार क्षेत्राच्या विकासात उत्तर कर्नाटकातील सहकार रत्नांची भूमिका मोठी आहे. असे दक्षिणचे आमदार अभय पाटील म्हणाले. बेळगावमधील अनगोळ, येथे बांधण्यात आलेल्या धनश्री मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या नूतन इमारतीचा उदघाटन कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.

प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिणचे आमदार अभय पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ, सहकार विभागाचे उपनिबंधक एम.एन. मणी आदी मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांच्या हस्ते समारंभाचा शुभारंभ करण्यात आला.

समारंभाचे उद्घाटन करून बेळगाव दक्षिण चे आमदार अभय पाटील म्हणाले की, कर्नाटकातील विशेषतः उत्तर कर्नाटक भागात समाजाच्या विकासात सहकार क्षेत्राची भूमिका मोठी आहे. अनेक सहकार रत्नांच्या प्रयत्नांमुळे आज सहकार क्षेत्राला चालना मिळाली आहे. . धनश्री बहुउद्देशीय सहकारी संस्थेने आपल्या कामकाजात पारदर्शक कार्याची ओळख कायम ठेवली आहे. पुढील वाटचालीत आणखी यश मिळावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

विधानपरिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी , आज मुंबई प्रांतातील बेळगाव, बागलकोट, गदग हावेरीसह उत्तर कर्नाटकात झालेल्या सहकार चळवळीचे परिणाम आपण पाहू शकतो. इतरत्र तुम्हाला मनी लँडिंग सारखे प्रकार पाहायला मिळतात पण आमच्या जेष्ठानी सुरुवातीपासूनच समाज घडवण्याचे काम केले आहे. आज धनश्री को-ऑपरेटिव्ह सोसायटीने राष्ट्रीयीकृत बँकेसारखी इमारत बांधण्याइतपत प्रगती केली असून, त्याचे प्रमुख कारण म्हणजे ग्राहकांची मेहनत व परिषदेचे कार्य व कर्मचाऱ्यांची सेवा आहे असे ते म्हणाले

मुख्य व्याख्याता म्हणून आलेले सी.ए. सुनिल नागावकर म्हणाले कि पतसंस्था वंचितांच्या सक्षमीकरणाचे काम करतात. छोटे व्यापारी, कुटीर उद्योग, मजूर यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या नोंदी नाहीत. अशा विकासासाठी सहकारी संस्था कर्ज देऊन मदत करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

धनश्री मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष शिवाजी वाय. पावले यांनी सोसायटीची वाटचाल सांगितली. 4-5 जणांनी निधीतून सुरू केलेली ही सोसायटी आता अभिमानास्पद झाली आहे. गरजूंना कर्ज दिल्याने त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आपले योगदान दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष नितीन येतोजी, संचालक कॅप्टन कानडीकर, जगदीश बिर्जे, अर्जुन कोलकरा, गोपाळ गुरव, गोपाळ होनगेकर, संजीव जोशी, अप्पाजी पाटील, सोनल खांडेकर , सविता मोरे, नागेंद्र तरळे आदींचा सहभाग होता.

Tags: