बेळगाव शहर व उपनगरात अमली पदार्थाची विक्री जोरात सुरू आहे . हेरॉईन विक्री प्रकरणी , टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी अनगोळ येथील पाच तरुणांना अटक केली आहे .
प्रफुल्ल गजानन पाटील (वय २५ ) , सुशांत गोविंद कंग्राळकर (वय २६ ), दोघेही राहणार रघुनाथ पेठ अनगोळ , नारायण बाबुराव पाटील /(वय २२ ), राहणार मेन रोड अनगोळ, सुनील भैरू असलकर (वय २५ ) राहणार भांदूर गल्ली अनगोळ आणि सलमान बब्बर मोकाशी (वय २४ )रा . कुरबर गल्ली अनगोळ अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत .

टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी , उपनिरीक्षणक संतोष दलवाई , त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली . त्यांच्याजवळून ३१५०० रुपये किमतीचे ५ ग्राम १५० मिली हेरॉईन जप्त करण्यात आले आहे . त्याचा प्रमाणे जी ए ०८ के १२८३ क्रमांकाची करावी जप्त करण्यात आली आहे .
या तरुणांनी हे हेरॉईन कुठून मागवले याची चौकशी करण्यात येत आहे .


Recent Comments