बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावात आक्काताई लंगोटी या वृद्ध महिलेने गृहलक्ष्मी योजनेतुन मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला जेवण दिले आहे. आजीने पाच जणांना भेटवस्तू सुद्धा दिल्या आहेत
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील सुतट्टी गावात आक्काताई लंगोटी या वृद्ध महिलेने गृहलक्ष्मी योजनेच्या मिळालेल्या पैशातून संपूर्ण गावाला जेवण दिले .
सिद्धरामय्या दर महिन्याला दोन हजार देत आहेत. राजकीयदृष्ट्या सिद्धरामय्या यांनी आणखी वरचढ व्हावे. त्यामुळे ग्रामदैवताची पूजा करून अन्नदान केल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी पाच जणींना आजीनी भेटवस्तू दिल्या आहेत. सुतट्टी गावातील महिलांनी आजीच्या कार्याला साथ दिली आहे.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वृद्ध महिला आक्काताई लंगोटी यांना फोन करून त्यांच्याशी बोलले .
तुमचे काम पाहून खूप आनंद झाला. तुमच्यासारख्यांना देऊन गृहलक्ष्मी योजना सार्थकी लागली . तो व्हिडीओ सिद्धरामय्या यांना दाखवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गावात सर्वाना पुरणपोळीचे जेवण दिले मात्र तुमच्या मुलीला (लक्ष्मी हेब्बाळकर) बोलावले नाही . असे सांगत हेब्बाळकर यांनी आनंद व्यक्त केला. त्या वृद्ध महिलेनेही त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले. गृहलक्ष्मी योजनेचा संपूर्ण राज्यातील जनतेला फायदा होणार असल्याचे सांगितले .
यावेळी वृद्ध महिलेने सांगितले की, सिद्धरामय्या साहेबांवर आमचे आशीर्वाद आहेत. याशिवाय तिने हेब्बाळकर यांना मला मुली नाहीत, तू आमची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर हेब्बाळकर यांनी आपला पीए वृद्ध महिलेकडे पाठवून वृद्ध महिलेचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आणि तुमच्या मुलीने ही साडी दिली आहे, असे सांगून तिला सिल्कची साडी भेट दिली.
Recent Comments