बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील बसस्थानकावर व्यक्तीच्या पायावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
बसची वाट पाहत असताना 40 वर्षीय सदाशिव यादव यांच्या पायावर बस गेल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
त्यांना चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्याला पुढील उपचारासाठी बेळगावच्या बीम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही घटना चिक्कोडी पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.
Recent Comments