मानवतावादी मूल्यांची देणगी देणारे कविहृदयी आणि साहित्यिक हे आपल्यासाठी आदर्श आहेत अशी प्रतिक्रिया साहित्यिक जयंत कायकिणी यांनी व्यक्त केली. जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, बेळगाव येथे आयोजित वैद्यकीय लेखकांच्या राज्य संमेलनात ते बोलत होते.
जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, बेळगाव येथे आयोजित 5 व्या कन्नड वैद्यकीय लेखक राज्य संमेलनाचे उद्घाटन जयंत कायकिनी आणि डॉ. सोमेश्वर यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह विविध साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.

५वे कन्नड वैद्यकीय लेखकांच्या राज्य संमेलनात कन्नड ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची पुस्तके, छायाचिते, कर्नाटकातील प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
यावेळी बोलताना साहित्यिक जयंत कायकिनी म्हणाले, १९७४ साली आपण कॉलेज प्रतिनिधी म्हणून आलो होतो. आता पुन्हा मी याच ठिकाणी आलो असून वैद्यकीय साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, वैद्यकीय साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी राज्याच्या विविध भागात वैद्यकीय साहित्य शिबिरे आयोजित करून लेखनशैलीची माहिती द्यावी.
यावेळी डॉ. प्रभाकर कोरे, जयंत कायकिणी, डॉ. श्रीधर के आर. डॉ. ना. सोमेश्वर, डॉ. नितीन एम गंगणे आदींसह अनेक साहित्यिक उपस्थित होते.


Recent Comments