Belagavi

येडियुरप्पा मार्गावरील पथदिव्यांचे पॅनल धोकादायक स्थितीत!

Share

बेळगावमधील येडियुरप्पा मार्गावरील समस्यांचा पाढा चढत्या आलेखात सुरूच असून आता येथील पथदीपांच्या पॅनेलची अवस्था धोकादायक बनल्याचे समोर आले आहे. या पॅनेलची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

येडियुरप्पा मार्गावर उभारण्यात आलेले पथदीपांचे पॅनल गंजले असून यामधील वीजतारा लोम्बकळणाऱ्या स्थितीत दिसून येत आहेत. पॅनेलचे दरवाजे निखळले असून पावसाळ्यात उघड्यावर असलेल्या वीजतारांमुळे विजेचा धक्का लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्यावेळी या मार्गावरून बहुसंख्य नागरिकांची वर्दळ असते. नकळत कुणाचाही हात या पॅनेलला लागला तर उघड्यावर असलेल्या वीजतारांमुळे विजेचा धक्का लागून अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.

यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी हि समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Tags: