महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या रामगिरी महाराज यांच्या मोहम्मद पैगंबर विरोधी वक्तव्याचा , बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला . त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करीत बेळगाव तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

हिरेबागेवाडी येथील गैस शहावली कादरी दर्ग्याचे सय्यद अश्रफ पीर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा निषेध करत व मुस्लिम धर्मगुरू आझरी यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले व तहसीलदार बसवराज नागराल याना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात आंदोलकांनी मोहम्मद पैगंबर प्रकरणी महाराष्ट्रातील रामगिरी महाराजांवर कठोर कारवाई करावी. तसेच, मुस्लिम धर्मगुरूंनी अझरीला सोडण्याची विनंती केली.
यावेळी सीपीआय नीलगार आणि आंदोलक आदी उपस्थित होते.


Recent Comments