Banglore

सरकार पाडण्याची भाजपची रणनीती खरी असू शकते : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी अमित शाह यांना आमचे सरकार नष्ट करण्याचे वचन दिले असेल, परंतु आपण या प्रकरणात सावधगिरी बाळगली पाहिजे. असे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले .

बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी हे अनेक महिन्यांपासून काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे. याआधीही सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी अमित शहा यांना शब्द दिला असावा, असेही मुख्यमंत्र्यांनी काल सीएलपी बैठकीत सांगितले.

वेगवेगळ्या राज्यात अनेक सरकारे पडली. भाजप शांत बसणारा नाही. त्यामुळे सावधानता बाळगावी लागेल, ‘राजकारणात असे होईल, असे म्हणता येणार नाही. असे ते म्हणाले.

Tags: