विजयपुर जिल्ह्यात काल दुपारी आणि रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत.
विजयपूर तालुक्यातील लोगमवी तांडा येथे तीन एकर क्षेत्रात पिकलेली द्राक्षे आता जमीनदोस्त झाली आहेत . . राजू मल्लाप्पा हुन्नूर या तरुण शेतकऱ्याच्या तीन एकर जमिनीत सुमारे 2700 द्राक्ष वेळी लावल्या होत्या . सुमारे 18 लाख रुपये खर्च करून पिकवलेल्या द्राक्षापासून उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या शेतकरी राजूला पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे . निम्मी द्राक्षे जमिनीवर कोसळली आहेत कर्ज काढून उत्पन्नाची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे . शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी राजू यांनी केली आहे.


Recent Comments