मुडा घोटाळाप्रकरणी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत विजयपूर मधील भाजप नेत्यांनी जोरदार निदर्शने केली.
मुडा आणि वाल्मिकी घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी भाजपाच्यावतीने करण्यात आली. विजयपूरमधील श्री सिद्धेश्वर मंदिरापासून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गांधी सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी मंत्री जमीर अहमद खान, कृष्णा बैरेगौडा, विधान परिषद सदस्य इव्हान डिसोझा यांनी राज्यपालांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी माजी मंत्री एस.के. बेळुब्बी, भाजपचे जिल्हाध्यक्ष आर.एस. पाटील कुचाबाळ, शिवरुद्र बागलकोट, राहुल जाधव, गुरुलिंगप्पा अंगडी, विजुगौडा पाटील, शंकर हुगार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments