Banglore

मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर मुडा प्रकरण सीबीआयकडे सोपवा – आर.अशोक

Share

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराने परिसीमा ओलांडली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. असा हल्लाबोल विरोधी पक्ष नी आर अशोक यांनी राज्य सरकारवर केला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मंड्या शहरामध्ये , राज्यपालांविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या विरोधात निदर्शने केली आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी केली. त्यांनी राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांविरोधात बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांना जातीवाचक शिवीगाळ आणि गुंडा कायद्यांतर्गत अटक करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना आर. अशोक यांनी मुडाची जप्त केलेली जमीन सिद्धरामय्या यांनी विकत घेऊन वाटली. मात्र ते या विषयावर खोटे बोलत आहेत. ताकद असेल तर हे प्रकरण सीबीआयकडे द्या, असे आव्हान दिले. राज्यपालांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना गुंडा कायद्याखाली अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: