RAIN

विजयपुरात मुसळधार पाऊस : शेतकरी सुखावला

Share

पावसाळ्यात गायब झालेला वरुणदेव आता विजयपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला आहे.

आज सकाळपासून विजयपुर शहरात दाट ढगाळ वातावरण होते . सायंकाळी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. नाले तुडुंब भरून पावसाचे पाणी रस्त्यावर आले. शेतात पाणी साचलेले दिसले. नाले ओढे ओसंडून वाहत होते. गेल्या आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

विजयपुर शहरातील , इंडी, तालिकोटे, नालतवाड , होरती , तांबा, आलमट्टी यासह जिल्ह्यातील विविध भागात काल रात्री आणि आज विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .

Tags: