धारवाड जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या जन्म-मृत्यूची नोंदणी 21 दिवसांच्या आत करणे आवश्यक असून नागरिकांकडून येणाऱ्या अर्ज विनाविलंब हाती घेऊन तातडीने जन्म – मृत्यू दाखले देण्यात यावेत, शिवाय दाखल्याची पहिली प्रत मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना धारवाडच्या जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी केल्या आहेत.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सरकारी अथवा खाजगी आरोग्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या जन्म-मृत्यूची नोंदणी ही जन्म-मृत्यू कायद्यांतर्गत विहित नमुन्यात २१ दिवसाच्या आत करणे आवश्यक असून नागरिकांकडून येणारे अर्ज स्वीकारून थेट मुख्य निबंधक, बेंगळुरू यांच्याकडे सादर करण्यात यावेत, अर्ज तातडीने हाती घेऊन नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले तातडीने देण्यात यावेत, शिवाय दाखल्याची पहिली प्रत मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दिव्या प्रभू यांनी केल्या आहेत.


Recent Comments