राज्यपालांविरोधात काँग्रेस नेत्याने केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करत धारवाडमधील भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. राज्यपालांविरोधात काँग्रेस नेत्याने केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करत त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अरविंद बेल्लद म्हणाले, भ्रष्ट मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे असलेल्या जमिनीसंदर्भात राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांसंदर्भात अवमानकारक वक्तव्य केले असून जमीर अहमद, इव्हान डिसोझा यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर वक्तव्य केली जात आहेत, हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे राजीनामा द्यावा. भैरती बसवराज यांनी हेलोकपटरमधून जाऊन मुडा व्यवहाराची कागदपत्रे आणली आहेत. प्रसारमाध्यमांनादेखील ही कागदपत्रे मिळाली असून २९ रोजी राज्यपाल आपली भूमिका स्पष्ट करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments