Belagavi

लिंगायत स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात द्यावी माहिती: लिंगायत नुरू कायक जमाती महासंघाची मागणी

Share

बेळगावात लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात माहिती माहिती देण्याची विनंती लिंगायत नुरू कायक जमाती महासंघाच्या वतीने करण्यात आली .

बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लिंगायत नुरू कायक जमाती महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करून लिंगायत समाजाला नवीन प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदान व निधीबाबत माहिती देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लिंगायत महासंघाचे चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले कि, , 2018 मध्ये बेळगावातील लिंगायत स्मशानाच्या विकासासाठी 1 कोटी अनुदान देण्याबाबत सांगण्यात आले होते . अनुदानासह , बेळगाव शहरातील 4 लिंगायत स्मशानाच्या विकासाची संपूर्ण माहिती द्यावी असे ते म्हणाले .

महासंघाचे प्रेम चौगला म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला , याची माहिती द्यावी, तसेच लिंगायत समाजाच्या विकासाबाबत चर्चा व्हायला हवी.

यावेळी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Tags: