Karnataka CM

खटला चालवण्यास राज्यपाल परवानगी देतील अशी कुमारस्वामींना भीती : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या विरोधात गर्जना केली. नियमांचे उल्लंघन करून खाण कंपनीला मंजुरी देण्याबाबत कुमारस्वामी यांच्यावर न डगमगता कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी विजयपूर जिल्ह्यातील अलमट्टी जलाशयाला बागीन अर्पण केली .
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .ते म्हणाले कि , कुमारस्वामींना अटक केली जाईल असे कुठेही सांगितले नाही. त्यांना अटक करण्याची संधी असल्यास ते अटक करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. आता तशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता कुमारस्वामी घाबरू लागले आहेत. खटला चालवण्यास राज्यपाल परवानगी देतील, अशी भीती त्यांना वाटत आहे. सिद्धरामय्या म्हणाले की लोकायुक्तांनी तपास आणि कागदपत्रे गोळा केल्यानंतर खटला चालवण्यास परवानगी देण्यास सांगितले आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार , मंत्री शिवानंद पाटील , मंत्री एम बी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते .

Tags: