उगार खुर्द येथील वाल्मिकी नगर मधील शालेय विद्यार्थ्यांसमोर वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याची परिस्थिती ओढवली असून या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार राजू कागे यांच्याविरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
कागवाड मतदार संघाचे आमदार राजू कागे यांच्या मतदार संघातील उगार खुर्द येथील वाल्मिकी नगर मध्ये मुलांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागत असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. येथील असुविधांमुळे नागरिकांचे हाल होत असून नागरिक लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त करत आहेत.
उगार खुर्द येथील गावांमध्ये रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अन्यथा आमदार राजू कागे यांच्या कार्यालयाला घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Recent Comments