भावंडं म्हणून लहानाचे मोठे एकत्रच झालो.. परंतु मालमत्तेच्या वादातून सध्या भावाकडूनच आपल्या कुटुंबाचा चल होत असून रायबाग तालुक्यातील निलजी गावातील एका कुटुंबाने बेळगावच्या पोलीस आयुक्तांकडे आपल्याला या प्रकरणी न्याय मिळवून द्यावा किंवा दयामरण द्यावे अशी मागणी केली आहे.
रायबाग तालुक्यातील निलजी गावातील तमन्ना परसाप्पा कांबळे यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांवर जमिनीच्या वादातून सतत मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आहे त्या परिस्थितीत घर सोडून निघालेले हे कुटुंब तीन दिवसांपासून सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून आपल्याला कुठेही न्याय मिळत नसल्याचे सांगत अखेर पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी धडक दिली आहे.
जमिनीच्या वादातून आमच्या कुटुंबावर हल्ला केला जात आहे. आपल्याला 3 मुले असून यापैकी दोघे अपंग आहेत. अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबावर हल्ला केला जात असून यासंदर्भात आपण कुडची पोलीस स्थानकात अनेकवेळा तक्रारही केली आहे. परंतु आपल्याला न्याय मिळाला नाही, गेल्या तीन दिवसांपासून बेळगावात विविध कार्यालये आपण भटकत असल्याचे तरव्वा कांबळे यांनी सांगितले. ()
आम्ही बहिणीची जमीन नांगरतो. त्यामुळे वसंत कांबळे, भीमाप्पा कांबळे, अशोक कांबळे, पारिस कांबळे यांच्याकडून आमच्या कुटुंबीयांवर सातत्याने हल्ले होत आहेत. 3 महिन्यांपासून त्रास सहन करून आपण कंटाळलो असून आपल्या या त्रासात पोलिसांनी देखील मदतीला येणे टाळले आहे. आपल्यावर सातत्याने प्राणघातक हल्ला करण्यात येत असून आमच्या कुटुंबाला एक तर न्याय मिळवून द्यावा अन्यथा द्या मरण द्यावे अशी विनंती तमन्ना परसप्पा कांबळे यांनी केली.
मारहाण झालेल्या तमन्ना कांबळे यांचा मुलगा कल्लाप्पा आणि सून आरती कांबळे यांनीही सदर प्रकाराबाबत माहिती दिली असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला कोणीही प्रतिसाद देत नाही. मारहाण झालेल्यांनाही रुग्णालयात उपचार मिळत नाहीत. घरातील सामानाचीही नासधूस केली गेली असून गेल्या तीन महिन्यांपासून आमच्यावर अन्याय होत असल्याचे उभयतांनी सांगितले. प्रकारानंतर आम्ही घर सोडून बसस्थानकात राहात असून आम्हाला न्याय द्या किंवा दयामरण द्या असे अशी विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांना केली.
गेल्या तीन महिन्यांपासून अन्यायाचा सामना करत असेल्या या कुटुंबाच्या प्रश्नाला पोलीस प्रशासन प्रतिसाद देईल का? या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन न्याय देऊन शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Recent Comments