मुलांमधील पोलिसांची भीती दूर करून मुलांना पोलिसांच्या कामाची जाणीव करून दिली पाहिजे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी व्यक्त केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पोलीस विभाग, स्पंदन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला संरक्षण, हक्क आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर आयोजिण्यात आलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या कार्यशाळेचे उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आजच्या मुलांमध्ये पोलिसांच्या कामाविषयी जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे, काही वर्षांपूर्वी पोलिस आणि मुलांमध्ये मैत्री होती, सर्व अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पोलिसांबाबत जनजागृती केली, त्यांच्या तक्रारी दूर केल्या. जनता आणि कायद्यानुसार काम करणे हे पोलिस विभागाचे उद्दिष्ट आहे. पोलिसांना घाबरण्याची नव्हे तर आपुलकीची भावना ठेवली पाहिजे, महिलांचे संरक्षण ही पोलीस खात्याची जबाबदारी आहे. मात्र महिलांनाही स्वसंरक्षणाची कला अवगत झाली पाहिजे, असे डॉ. नागलक्ष्मी चौधरी यांनी व्यक्त केले.
यावेळी पी मुरली मोहन रेड्डी, रामगोंड बी. बसरगी, श्रीमती. व्ही. सुशील, रवींद्र तोटगेर, प्रतिमा जोशी यांच्यासह महिला आयोगाचे व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments