Belagavi

कर्ले खून प्रकरणातील आरोपीना लवकरच करू गजाआड : बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग

Share

बेळगाव तालुक्यातील कर्ले गावात रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी दिली .

बुधवारी शहरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कर्ले गावातील मोहन तलवार (52) यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा सुगावा लागला असून , लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल. हत्येचे कारण समजू शकलेले नाही. आरोपींना अटक केल्यानंतर कळेल, असे ते म्हणाले.

बेळगावात पार्किंगची समस्या असलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, अशी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.  शहरात घरफोडी, , दुकान चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी विशेष टीम तयार करून पुन्हा असे प्रकार घडू नयेत याची काळजी घेतली जाईल. जनतेने पोलीस विभागाला सहकार्य करावे. चोरी झाल्यास, थेट 112 वर कॉल करा असेही त्यांनी सांगितले .

Tags: