महिला व बालविकास मंत्री तथा ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंगळवारी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बाकनूर या गावात विविध रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मतदार संघाचा सातत्याने विकास होत असून प्रत्येक गावात एकापाठोपाठ एक विकासकामे सुरू आहेत. विकासासाठी मतदार संघातील लोकांचे सहकार्यही आवश्यक आहे. सर्वांचे सहकार्य असेल, तर मी अधिकाधिक प्रकल्प घेऊन येण्यास उत्सुक आहे. मतदार संघाच्या विकासासासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन जनतेला करत रस्ते विकासकामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत अशा सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या.

या वेळी युवराज कदम, मनू बेळगावकर, सुरेश नाईक, पांडुरंग नाईक, रामनिंग सावंत, परशुराम मजुकर, मारुती नाईक, कृष्णा नाईक, काळू नाईक, निंगू कुलाम, राजू गावडे, टोपण्णा नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments