रक्ताच्या पलीकडचे भावाबहीणीचं हे अतूट नातं जपण्यासाठी आम्ही संजीवीनीच्या काळजी केंद्रात आलो आहोत, भारतीय संस्कृती ही विविधांगी विषयांनी परिपूर्ण आहे. त्यामध्ये वर्षभर अनेक सण समारंभ आम्ही साजरे करत असतो. वेगवेगळ्या शारीरिक मानसिक व्याधीमुळे संजीवीनी काळजी केंद्रात दाखल झालेल्या सदस्यांसोबत सगळे सण साजरे केले जातात,आजचा रक्षाबंधन कार्यक्रम आमच्यासाठी एक अविस्मरणीय असल्याची भावना जेष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
संजीवीनी फौंडेशनमध्ये जेष्ठ नागरिक संघटनेच्या सदस्यांसोबत रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला पुष्पा हिरेमठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याची माहिती देऊन मनोरुग्णांनी आकर्षक राख्या बनविल्या असल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित जेष्ठ नागरिकांना संजीवीनी काळजी केंद्रातील महिलांनी औक्षण करून राख्या बांधल्या. त्यानंतर केंद्रातील पुरुषांनासुध्दा औक्षण करून राख्या बांधण्यात आल्या.

यावेळी अध्यक्ष विश्वास धुराजी सेक्रेटरी सुरेंद्र देसाई खजिनदार गुरूनाथ शिंदे, रवींद्रनाथ जुवळी, स्नेहलता जुवळी, पांडुरंग कारकल, श्रीकृष्ण खानोलकर, विनायक वेलंगी, विठ्ठल देसाई,उल्हास पानसे, महावीर कुट्टे हे उपस्थित होते. शेवटी सीईओ मदन बामणे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जेष्ठ नागरिक संघटनेचे आभार मानले.


Recent Comments