Hukkeri

हुक्केरीत देवराज अर्स जयंती साजरी

Share

हुक्केरी येथे देवराज अर्स जयंती साजरी करण्यात आली. हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर महास्वामी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमास विविध मान्यवरांनीही उपस्थिती दर्शविली होती.

मागासवर्गीय कल्याण विभाग, हुक्केरी तालुका प्रशासन आणि नगरपालिका संकेश्वर, हुक्केरी यांच्या संयुक्त विद्यमाने देवराजू अर्स यांची १०९ वर्षांच्या जयंतीनिमित्त क्यारगुड्ड येथील मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका दंडाधिकारी श्रीमती मंजुळा नाईक यांच्या हस्ते देवराज अर्स प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन पार पडले. व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी टी.आर.मल्लाडद, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिदनाळ, जिल्हा पंचायत प्रशासक शशिकांता वंदाळे, अक्षर दासोहच्या संचालिका सविता हळकी, महसूल अधिकारी एम.बी.सरापुरे आदी उपस्थित होते.

हुक्केरी तालुका मागासवर्गीय कल्याण अधिकारी मलगौडा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात चंद्रशेखर महास्वामी यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले, देवराज अर्स यांनी दीन-दुःखी लोकांचे जीवन प्रकाशमान केले. त्यांचे कर्तृत्व आजही अतुलनीय आहे.

निवृत्त प्राचार्य, व्याख्याते पी.जी. कोन्नूर म्हणाले की, कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांच्या योजनांमध्ये जमीन सुधारणा, शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण, बेरोजगारांसाठी योजना, सेवानिवृत्ती वेतन, किमान वेतन आदींचा समावेश होता. या योजना आजतागायत अजरामर आहेत .

यावेळी मंजुनाथ महाराजांनी देखील देवराज अर्स यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सिद्दप्पा नाईक, लक्काप्पा हवेली, तुकाराम मादार, अजीम नायकवडी, बी.एस.शिरगावी, जी.एस.यादवाड, एन.एम.कोते, एस.बी. मुल्ला, बी.ए. हुडेद, श्रीदेवी सोंडी आदी उपस्थित होते.

Tags: