Belagavi

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी इव्हान डिसोझा यांच्यावर स्वयंप्रेरित गुन्हा करा दाखल…

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा मागण्यापूर्वीच बंगाल प्रमाणे , आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेसजनांच्या धोरणाचा निषेध करत बेळगाव भाजप युवा मोर्चातर्फे आज आंदोलन करण्यात आले.

बेळगाव येथील राणी चेन्नम्मा सर्कल येथे बेळगाव भाजपा युवा मोर्चातर्फे आमदार इव्हान डिसोझा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी देणाऱ्या राज्यपालाच्या विरोधात , विधानसभा सदस्य इव्हान डिसोझा यांच्या वक्तव्याचा बेळगाव युवक भाजपने निषेध केला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतरच राज्यात बंगाल धर्तीवर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. आमदार इव्हान डिसोझा यांनी प्रक्षोभक विधान केले आहे. त्यांच्यावर स्वयंप्रेरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे , बेळगाव महानगर अध्यक्ष महादेव धरेन्नावर यांनी केली.

यावेळी महांतेश चिन्नाप्पा गौडा यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

Tags: