Dharwad

चक्कडी रस्त्यासाठी अनुदान किती आले हि जाहीर करावे : माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांची मागणी

Share

चक्कडी रस्त्यासाठी जाहीर झालेल्या अनुदानाची माहिती आमदारांनी जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी केली आहे.

नवलगुंद येथे प्रसारमाध्यमांना उत्तर देताना ते म्हणाले, ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी आमदारांनी किती पैसा आणला हे आम्हाला माहीत आहे. मात्र मिळालेल्या अनुदानाबाबत आमदारांनी याची माहिती जनतेला द्यावी.

यापूर्वीच चक्कडी रोडच्या नावाखाली ऐतिहासिक टेकडीवरील माती लुटली गेली आहे. यावर खाण आणि भूविज्ञान विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. येथे सर्व गोष्टी बेकायदेशीर सुरु असून आता अनुदानाची माहिती जनतेला मिळणे गरजेचे आहे. अनुदान किती आले, किती खर्च झाले आणि शिल्लक किती आहे याची इत्यंभूत माहिती त्यांनी जनतेला द्यावी, अशी मागणी शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी केली आहे.

Tags: