कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगर पालिका , कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत देवराज अर्स यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ केला .

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत . देवराज अर्स हे देशातील समानतेचे प्रणेते आहेत. दलित आणि मागासलेल्यांच्या उत्कर्षासाठी ते सदैव काम करणारे दानशूर नेते होते. देवराज अर्स यांचे योगदान, समरसता निर्माण करण्याचा पाया आहे. देशाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे, प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांचा आदर्श अंगीकारल्यास पुढच्या पिढीसाठी चांगला समाज घडू शकतो, असे ते म्हणाले.
विविध विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ही मिरवणूकही जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होऊन राणी चेन्नम्मा सर्कल, आरटीओ संगोळी रायण्णा सर्कल, एसपी ऑफिस रोड मार्गे कुमार गंधर्व कलामंदिर येथे येऊन सांगता झाली.


Recent Comments