Vijayapura

मुसळधार पावसामुळे भाजी मार्केटमध्ये पसरली दुर्गंधी

Share

विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड येथे मुसळधार पावसामुळे नागरिक व ग्राहकांची धावपळ उडाली.

नालतवाड भाजी मंडईत अशास्त्रीय नाल्याच्या बांधकामामुळे बाजारात पाणी शिरले. त्यामुळे बाजारपेठेत भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. गटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी विकत न घेताच ते परत गेले . भाजी मार्केटमध्ये कुजलेल्या भाज्या आणि गटारीचे पाणी यामुळे दुर्गंधी पसरली आहे .

Tags: