DAM

आलमट्टी जलाशयावर आकर्षक विद्युत रोषणाई

Share

कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलमट्टी धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून उद्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हि रोषणाई करण्यात आली आहे.

ही विद्युत रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून विद्युत रोषणाईमुळे धरणाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. तब्बल 124 TMC साठवणक्षमता असलेले हे धरण सध्या मोठ्या क्षमतेने भरले असून 2005 साली बांधण्यात आलेले हे धरण कर्नाटकची वेगळी ओळख निर्माण करत आहे. संध्याकाळच्या सुमारास या धरणावर असलेल्या दरवाजांवर नयनरम्य अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून जेव्हा धरणाचे सर्व दरवाजे उघडले जातात तेव्हा ही विद्युत रोषणाई सर्वाचेच लक्ष वेधून घेते..

उद्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच रोषणाई पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्हाप्रशासनाने जलाशय परिसराची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या मुडा घोटाळाप्रकरणी अधिक चर्चेत असून याच दरम्यान आखण्यात आलेल्या या दौऱ्यामुळे अधिकच उत्सुकता वाढली आहे. उद्या मुख्यमंत्र्यांसमवेत उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, मंत्री एम.बी. पाटील, शिवानंद पाटील हे आमदार देखील सहभागी होणार आहेत.

Tags: