Chikkodi

आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याने विद्यार्थ्यांना अश्रू अनावर

Share

रायबाग तालुक्यातील अलगवाडी गावातील मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्याने अश्रू अनावर झाले.

बदली झालेले शिक्षक जी एम मठपती हे गेल्या 12 वर्षांपासून याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याशिवाय एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवण्याचा मानही त्यांना मिळाला होता. काल संध्याकाळी, बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील बेलगळी गावातील शाळेत बदली झाल्याने त्यांच्यासाठी निरोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभानंतर त्यांचे आवडते शिक्षक जाताना ‘सर, आमची शाळा सोडू नका, इथेच राहा’ असे म्हणत विद्यार्थ्यांचे अश्रू ढाळले.

Tags: