उद्या श्रावण महिन्याची पौर्णिमा . या दिवशी रक्षाबंधन सण साजरा केला जातो . . या सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या बाजारपेठेत महिला ग्राहकांची राख्या खरेदीसाठी गर्दी झाली असून , रंगबिरंगी आकर्षक राख्या बेळगावकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भावा-बहिणीच्या नात्याचा सण रक्षाबंधन उद्या देशभरात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावातही राख्यांची विक्री जोरात सुरु आहे. शहरातील गणपती गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली या प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये रंगीबेरंगी राख्या बहिणींना आकर्षित करत आहेत.
रेशमी दोऱ्यापासून बनवलेल्या , जर , कुंदन, रणबीरगी मोती ,खडे , हाताने बनवलेल्या आणि इतर प्रकारच्या राख्या 1 ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. आता डोरेमॉन, छोटाभीम, लायटिंग आदी आकर्षक राख्या हे लहान मुलांचे आकर्षण ठरत आहे. याबाबत दुकानदार अमर बाळेकुंद्री यांनी अधिक माहिती दिली.
भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र घराघरात साजरा होणार असून, सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


Recent Comments