Belagavi

जायंट ही स्वदेशी चळवळ असून ती अजून वाढण्याची गरज आहे : एन लक्ष्मणन

Share

देशावर ज्या ज्या वेळी राष्ट्रीय आपत्ती आल्या त्या त्यावेळी जायंट्स ग्रुप त्या आपत्ती निवारणार्थ धावून गेलेला आहे. जायंट ही स्वदेशी चळवळ असून ती अजून वाढण्याची गरज आहे” असे प्रतिपादन जायंट्स इंटरनॅशनल चे डेप्युटी वर्ल्ड चेअरमन एन लक्ष्मणन यांनी बोलताना व्यक्त केले.

जायंट्स ग्रुप ऑफ ब्रम्हावर च्या वतीने रविवारी ब्रह्मावर येथील हॉटेल रॉयल इन येथे संपन्न झालेल्या कर्नाटक युनिटच्या परिषदेप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कर्नाटक राज्यातील 28 ग्रुपचे विविध सदस्य उपस्थित असलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी फेडरेशन सहा चे अध्यक्ष लगमाना दोडमणी हे होते तर व्यासपीठावर जायंटस् चे सेंट्रल कमिटी मेंबर दिनकर अमीन, स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर, गजानन निलकेरी , ब्रह्मावर ग्रुपचे अध्यक्ष सुंदर पुजारी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले द्वारकायी मठाचे मठाधीश साई ईश्वर गुरुजी हे होते.


दीप प्रज्वलनाने या परिषदेस प्रारंभ झाला उपस्थितांचे स्वागत परिचय जायंट्स प्रार्थना वगैरे झाल्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. बेळगावतून या परिषदेसाठी विभागीय संचालक अनंत लाड, मेनचे अध्यक्ष अविनाश पाटील, सेक्रेटरी यल्लाप्पा पाटील, सदस्य जयवंत पाटील, माजी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, मधु बेळगावकर ,भास्कर कदम,अनंत कुचेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित असलेले प्रशिक्षक राजेंद्र भट यांनी अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केले .परिषदेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. अनंत लाड यांनी युनिट एक चा अहवाल सादर केला. तर यल्लाप्पा पाटील ,आरती शहा व सखीच्या वतीने अविनाश पाटील यांनी आपापल्या ग्रुपचे अहवाल सादर केले.

दुपारच्या सत्रात जायंट्स चळवळ वाढविण्यासाठी कशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले. ब्रम्हावर सारख्या निसर्गरम्य परिसरात संपन्न झालेल्या या परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Tags: