महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह बेळगाव येथील कॅम्प परिसरातील महात्मा गांधी सर्कल ते ग्रामीण भागातील कुद्रेमनी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन रस्त्याच्या परिस्थितीची कसून पाहणी केली. रायचूर-बाचीला जोडणारा हा राज्य महामार्ग असून हिंडलगा-सुळगा-तुरमुरी-बाची व आजूबाजूच्या गावांना जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता पूर्णत: खराब झालेला व जाण्यायौग्य नसल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय टाळावी, असे आदेश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोबरद , सहायक कार्यकारी अभियंता शशिकांत कोळेकर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय महांतेश वज्रमट्टी, सोमू दोडवडी आदी उपस्थित होते.


Recent Comments