कोलकाता येथील मेडिकल कॉलेज मधील वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करून न्यायासाठी भाजप महिला मोर्चाकडून देशभरात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.
बेळगावात भाजप महिला मोर्चाच्या वतीने , मेणबत्ती मोर्चा काढून कोलकाता घटनेतील मृत वैद्यकीय विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली . तसेच या घटनेतील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली .

या कँडल मार्च मध्ये , बेळगाव जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा .नयना भस्मे, कर्नाटक महिला मोर्चाच्या सचिव डॉ.सोनाली सरनोबत, बेळगाव महिला मोर्चाच्या सचिव भाग्यश्री कोकितकर, प्रियांका आजरेकर आणि महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या . महिला मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार संजय पाटील, बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव उपस्थित होते.


Recent Comments