Dharwad

महिला डॉक्टराच्या हत्ये प्रकरणी धारवाडमध्ये आंदोलन

Share

कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि हत्येचा निषेध आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत धारवाडमधील वैद्यकीय विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून निषेध केला.

ऑल इंडिया वुमेन्स कल्चरल ऑर्गनायझेशन, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशन, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट ऑर्गनायझेशन यांच्या नेतृत्वाखाली धारवाड शहरातील कला भवन ते विवेकानंद चौकापर्यंत निषेध मोर्चा काढून कोलकाता येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि हत्येचा निषेध नोंदविण्यात आला.

या घटनेने संपूर्ण मानवजातीला धक्का बसला असून, पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचा निषेध करण्यासाठी देशभरातील लोक रस्त्यावर उतरत आहेत. केंद्रीय गृहखात्याने यात तातडीने लक्ष घालून घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी, याप्रकरणी तपासाची गती वाढवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अन्यथा हिंसक संघर्षाच्या दिशेने पाऊल टाकावे लागेल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

Tags: