Udupi

उडुपी जिल्ह्यातील जनतेच्या सदैव सोबत – मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उडुपी जिल्ह्यातील पडुबिद्री-बेळन्नू-कारकळ या राज्य महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या टोल गेटला स्थानिकांचा विरोध असलेल्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांची बाजू घेतली.

दररोज वापरल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी दोनदा टोल भरणे शक्य नाही. याबाबत संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी बोलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आपण कधीही शब्द मोडला नाही. आश्वासनानुसार गेल्या महिन्यात ब्रह्मावर येथील कृषी डिप्लोमा महाविद्यालय रद्द करण्याचा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यामुळे आज कर्मचारी सुखावले आहेत. आता टोलनाक्याच्या मुद्द्यावर जनतेच्या बाजूने ठाम असल्याचे मंत्री म्हणाल्या .

Tags: