कुडचीतील डॉ. बी. आर आंबेडकर निवासी शाळेला आमदार महेंद्र तम्मन्नावर यांनी भेट देऊन पाहणी केली.

डॉ. बी. आर आंबेडकर निवासी शाळेला भेट देऊन तेथील माध्यान्ह आहार व्यवस्थेची आमदारांनी माहिती घेतली . यावेळी त्यांनी स्वतः जेवण करून शाळेची निवास व्यवस्था, जेवणाच्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शिक्षकांना, स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना भोजनाची कमतरता पडणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.
Recent Comments