Belagavi

मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड गावात पूरस्थिती

Share

मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील हलगा-बस्तवाड गावात मोठी आपत्ती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मोठा नाला तुंबल्याने , पाणी पुढे वाहू शकत नाही आणि पावसाचे पाणी निवासी भागात शिरले आहे. रस्त्यानं नदीचे स्वरूप आले असून, जनतेचे खूप हाल झाले आहेत .

घरासमोर उभी असलेली वाहनेही पाण्यात बुडाली आहेत . . नाल्याचे दूषित पाणी घरात शिरल्याने स्थानिकांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची भीती बळावली ;आहे.  समस्या सोडविण्यासाठी जेसीबीद्वारे नाल्यातील अडथळे दूर करण्याचे काम जोरात सुरू आहे.

Tags: