पोलाईट्स ऑफ बेलगाम वर्ल्डवाईड या सेंट पॉल शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कॅन्टोन्मेंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश कोणी, रोटरी क्लबचे गव्हर्नर शरद पै व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.

याबाबत इन न्यूजला अधिक माहिती देताना पोलाईट्स बेळगावचे अध्यक्ष डॉ. माधवप्रभू यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देत शिबिराच्या आयोजनाचा उद्देश विशद केला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेलगाम, सेंट पॉल हायस्कूल, पालक शिक्षक संघटना, पीबीडब्ल्यू, रोट्रॅक्ट बेलगाम आदींनी परिश्रम घेतले. या शिबिरात 200 हून अधिक लोकांनी रक्तदान केले.


Recent Comments