सधन नागरिकांच्या मी योजनांमध्ये कपात केल्यास सुमारे 10,000 कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. त्यामुळे आता हमी योजनांसंदर्भात नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शक्ती योजनेबाबत नागरिकांमध्ये सुरु असलेल्या चर्चेबाबत आपण फक्त वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र हमी योजनांमध्ये कपात करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. जनतेचे म्हणणे मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून याबाबत मंत्रिमंडळ पक्षाच्या पातळीवर निर्णय घेतात. हमी योजना मध्ये कपात करण्याबाबत आपण कोणतेही विधान केले नसून हमी योजना सधनांसाठी कपात केल्यास याचा लाभ गरीबांना होईल, इतकेच आपण बोललो आहोत.
मंत्री एच.सी. महादेवप्पा यांच्यासह इतरांनी या संदर्भात राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांना सल्ला दिला आहे. हमी योजनेच्या फेरविचारावर विधीमंडळ, मंत्री आणि पक्षीय पातळीवर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. सधन नागरिकांच्या हमी योजनेत कपात केल्यास सुमारे १० कोटींची बचत होऊ शकते, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.


Recent Comments