समृद्ध दिव्यांग फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचा एक भाग म्हणून ‘आपले बेळगाव, स्वच्छ बेळगाव’ अभियानांतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालयात फिनाईलची फवारणी करण्यात आली.
समृद्ध दिव्यांग फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनाचा एक भाग म्हणून बेळगावमध्ये आदर्शवत कार्य करण्यात आले. समृद्ध दिव्यांगारा फाऊंडेशन निर्मित फिनाईल सार्वजनिक शौचालयात फवारण्यात आली. शहरातील कडोलकर गल्ली, रामदेव गल्ली, खडेबाजार, देशपांडे गल्ली, रविवर पेठ, कॅम्प आदी भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी पद्मराज हुली, गौतम श्रॉफ, प्रशांत पोतदार, शिवनगौडा पाटील, प्रवीण हळियाळ यांच्यासह फेसबुक फ्रेंड सर्कलचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments