घरासमोर ठेवलेले पाण्याचे कॅन घेऊन चोराने पळ काढल्याची घटना पिरनवाडी गावातील सिद्धेश्वर नगर येथे घडला आहे.
अवघ्या 30 सेकंदात हि चोरी करून पळ काढल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील सिद्धेश्वर गल्लीत एका चोरट्याने घरासमोर ठेवलेला पाण्याचा डबा अवघ्या ३० सेकंदात उचलला. घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा व्हिडिओ कैद झाला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Recent Comments