स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगावात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
बेळगाव जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित ‘हर घर तिरंगा रॅली’ला महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, उपायुक्त रेश्मा तालिकोटी, नगरसेवक नितीन जाधव, माजी उपमहापौर रेश्मा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत चालना देण्यात आली.
याबाबत इन न्यूजला माहिती देताना महापौर सविता कांबळे यांनी सांगितले की, बेळगावात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून देशभक्ती जागृत करण्यासाठी हि रॅली आयोजिण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी बोलताना म्हणाले, हर घर तिरंगा रॅली स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आली आहे.
किल्ला तलाव येथून निघालेल्या या भव्य तिरंगा रॅलीमध्ये सुमारे ४५ मीटरचा भव्य तिरंगा ध्वज घेऊन एन.सी.सी. स्केटर, विद्यापीठ, शिक्षण विभागाचे कर्मचारी आदींसह हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. आरटीओ सर्कल, संगोळी रायण्णा सर्कल, कोर्ट रोड मार्गे राणी चन्नम्मा सर्कल येथे येऊन या रॅलीची सांगता झाली.


Recent Comments