क्षुल्लक कारणावरून आणखी एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर हल्ला केल्याची घटना धारवाड तालुक्यातील कबनूर गावात घडली असून हल्ल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

धारवाड तालुक्यातील कबनूर गावातील संतोष तलवार आणि अरविंद केंगनूर यांनी शिवानंद मादर याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून हल्ल्याचे कारण समजू शकले नाही . दोन तरुण एकमेकांना अंदाधुंद मारहाण करत असल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


Recent Comments