protest

मागासवर्गीय बनावट जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी विजयपूरमध्ये निषेध मोर्चा

Share

राज्यात मागासवर्गीय बनावट जात प्रमाणपत्र देण्याची प्रकरणे वाढल्याचा आरोप करत विजयपूर शहरात भव्य निषेध रॅली काढण्यात आली.

वाल्मिकी समाजाच्या विविध पुरोगामी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या रॅलीत शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी वाल्मिकी महामंडळ घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.

Tags: