Belagavi

कळसा-भांडुरा योजनेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

म्हादई, कळसा-भांडुरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी बेळगावात शेतकऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

म्हादई, कळसा-भांडुरा योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी बेळगावमधील शेतकऱ्यांनी आजपासून बेमुदत आंदोलन पुकारले आहे. अखिल कर्नाटक शेतकरी संघटना आणि हसिरू सेना यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

म्हादई, कळसा-भांडुरा योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी गेल्या २० ते ३० वर्षांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. नद्यांमधून पुढे समुद्रात जाणारे पाणी कळसा- भांडुरा प्रकल्पांतर्गत पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार असून म्हादई, कळसा-भांडुरा प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, जोवर कामकाज सुरु होत नाही तोवर आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात बिरप्पा देशनूर, महादेवी हुइलगोळ, हनुमंतप्पा देवीगिहळ्ळी, महंतेश कामते, इरण्णा अंगडी, महंतेशा छत्रद यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: