Vijayapura

विजयपूर भाजप शहर मंडळ तर्फे दिग्गज पुतळ्यांची मूर्तींची स्वच्छता

Share

15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजपच्या विजयपूर नगर मंडळाने शहरातील विविध पुतळ्यांची स्वच्छता केली.

यावेळी बाबासाहेब आंबेडकर, विश्वगुरु बसवण्णा, लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर , संत कनकदास , संत सेवालाल, श्री छत्रपती शिवाजी महाराज, गांधीजी , अहिल्याबाई होळकर, अटलबिहारी वाजपेयी, बाबू जगजीवन राव आदी प्रमुख नेत्यांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली .

शहर मंडल अध्यक्ष शंकर हुगार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित पुतळ्यांची स्वच्छता राखावी व थोर नेत्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने तिरंगा अभियानांतर्गत स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.


यावेळी विजयपूर नगर मंडल अध्यक्ष शंकर हुगार , महानगर पालिका सदस्य मल्लिकार्जुन गदगी नगर मंडल सरचिटणीस पपूसिंग राजपूत , प्रवीण कूडगी, रयत मोर्चा अध्यक्ष राजू बिरादार , युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण खमीमठ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अनंत चौधरी , एससी मोर्चा अध्यक्ष प्रकाश महेंद्र चौधरी, मोर्चाच्या अध्यक्षा लक्ष्मी अक्का कन्नोल्ली अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष संतोष कौतकर व सर्व मोर्चा सरचिटणीस उपाध्यक्ष सचिव जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष पांडू साहुकार दोडमणी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: