बेळगावमधील महावीर कॉलनी, मारुती नगर येथील घरात सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर खाक झाले. सुदैवाने यावेळी घरात कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संसारोपयोगी साहित्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चन्नाप्पा विठ्ठल लमाणी यांच्या घरात रात्री उशिरा अचानक सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 1 लाख 80 हजार रोख आणि 35 ग्रॅम सोने आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. चन्नाप्पा लमाणी हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. याच माध्यमातून त्यांनी जमापुंजी साठवून ठेवली होती.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली असून माळमारुती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन तपासणी केली.
Recent Comments