आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने ब्रह्मा कुमारीज युवा विभाग व युवा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा निवासी विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
युवा व क्रीडा विभागाचे उप संचालक श्रीनिवास बी. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी, जीवनात यश मिळवण्यासाठी तरुणांनी आपल्या ध्येयाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे सांगितले.

बी.के.अनुराधा कंवर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी तरुणांमध्ये सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे, कोणत्याही प्रकारची विचारसरणी शरीराची निर्मिती करते, राजयोगाचा अभ्यास केल्याने मनाची एकाग्रता वाढते असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजयोगाचे फायदे समजावून सांगितले. यावेळी कुस्तीपटू रोहिणी पाटील, कुतुज मुलानी, भाग्यश्री, ज्योती, बीके श्रीकांत आदी उपस्थित होते.


Recent Comments